जयपूर मधील ९ बॉम्बस्फोटांप्रकरणी चौघे दोषी
Updated On:

जयपूर (राज्यस्थान): मे २००८ मध्ये जयपूरमध्ये झालेल्या नऊ बॉम्बस्फोटांप्रकरणी न्यायालयाने चौघांना दोषी ठरविले. मोहम्मद सैफ (३२), मोहम्मद सरवार (३६), सैफ उर रेहमान (३६) आणि सलमान (३४) अशी आरोपींची नावे आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, धोकादायक तीक्ष्ण शस्त्रांचा वापर करून जखमी करणे, कट रचणे, बेकायदा कृत्ये या सर्व कलमांखाली न्यायालयाने या चौघांना दोषी ठरविले.
सरकारी पक्षाचे वकील श्रीचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या, गुरुवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. तर एकाची निर्दोष मुक्तता केल्याचे त्यांनी सांगितले. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.
टॅग्स:





