nagar | संत तुकाराम महाराज मंदिराचा पायाभरणीस प्रारंभ

टाकळीभान, (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नियोजित जगदगुरू संत तुकाराम महाराज मंदिर पायाभरणी शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला.
हभप रविंद्र महाराज गांगुर्डे, दत्तात्रय महाराज बहिरट यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते कुदळ टाकून व सुदाम देवळालकर गुरू यांनी विधिवत पूजा करून पायाभरणी शुभारंभ आज करण्यात आला. उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सरपंच मंजाबापू थोरात, जेष्ठनेते ज्ञानदेव साळुंके,
अशोक कारखान्याचे संचालक शिवाजीराव शिंदे, माजी उपाध्यक्ष दत्तात्रय नाईक, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, तुकाराम महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास पटारे, विश्वस्त द्वारकानाथ भालसिंग, लहानभाऊ पवार, राजेंद्र माने, अभिजीत लेलकर,
खुरूद, सुरेश गायकवाड, भास्कर कोकणे, बंडू हापसे, कृष्णा वेताळ, अजित थोरात, रामनाथ पटारे, बंडू पटारे, लहानभाऊ नाईक, धनराज कोकणे, प्रा. जयकर मगर, भाऊसाहेब पवार, अनिल पटारे, अमोल पटारे, नानासाहेब लेलकर, गोकुळ भालेराव, शिवाजी पवार, गोरक्षनाथ जाधव, प्रकाश काळे, रामेश्वर आरगडे, बापूसाहेब नवले, संभाजी पटारे, सुनिल भवार, खंडेराव गवांदे आदी उपस्थित होते.





