Asha Buchke : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके यांचे निधन; जुन्नर तालुक्यावर शोककळा
Asha Buchke : जुन्नरच्या राजकारणातील एक आक्रमक आणि लढाऊ महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड

Asha Buchke : जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील आक्रमक महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके यांचे दुःखद निधन झाले आहे. ग्रामीण भागातील प्रश्न, विकासकामे आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर त्या आक्रमकपणे भूमिका मांडत असत. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहणे हीच त्यांच्या राजकारणाची खरी ओळख राहिली.
त्यांच्या लढाऊ आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्या जुन्नरच्या राजकारणात चर्चेत राहिल्या. मात्र त्यांच्या निधनामुळे पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पुणे जिल्हा परिषद सदस्य ते जिल्हा परिषदेच्या गटनेत्या असा आशा बुचके यांचा राजकीय प्रवास राहिला. शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला.
2014 मध्ये त्यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतरही त्यांनी तालुक्यातील राजकारणात सक्रिय भूमिका कायम ठेवली. त्यानंतर 2026 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली होती. तिरंगी लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, आशाताई बुचके यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकारणातील एक आक्रमक आणि लढाऊ महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हेही वाचा:




