माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना डिस्चार्ज

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती स्थिर असून त्यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तापाची लक्षणे आणि प्रकृत्ती अस्वस्थ वाटत असल्याने डॉ. मनमोहन सिंह यांना काही दिवसांपूर्वी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
मनमोहन सिंह यांना या वर्षीच्या सुरूवातील करोना विषाणूची लागण झाली होती. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना 19 एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 29 एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्या दरम्यान काढलेला एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.





