नवी दिल्ली :– माजी खासदार आणि वरिष्ठ वकील माजिद मेमन यांनी बुधवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी दिल्लीत तृणमूलचे खासदार सौगत रॉय आणि डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत त्या पक्षाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले.
मेमन यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम ठोकला. राष्ट्रवादीने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले होते. राष्ट्रवादी सोडण्याचे नेमके कुठलेही कारण मेमन यांनी नमूद केले नव्हते. आता तृणमूलमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी ते पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले.
Tamil Nadu : एम. के. स्टॅलिन यांचे पुत्रही तामिळनाडूत झाले मंत्री
तृणमूलवासी बनल्यानंतर मेमन यांनी त्या पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. वाघीण असणाऱ्या ममतांचा आवाज केवळ बंगालमध्येच नव्हे; तर संपूर्ण देशात घुमत आहे, असे त्यांनी म्हटले.