मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये करणार प्रवेश; ‘या’ कारणामुळे झाली होती अटक

Sanjay Pandey | आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे ते मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय पांडे हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यांचे बेकायेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे संजय पांडे चर्चेत आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर ते होते. त्यानंतर आता माजी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
संजय पांडे यांचा मुंबई होणार पक्षप्रवेश
संजय पांडे हे 1986 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे. सुरूवातीला ते अंधेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले गेले. त्यानंतर वर्सोव्यातून विधानसभा लढविण्यासाठी ते इच्छुक असल्याचे म्हंटले जात आहे.
आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे मुंबई काँग्रेसच्या राजीव गांधी भवन या कार्यालयात सायंकाळी ४ वाजता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करणार आहेत.
संजय पांडेंना झाली होती अटक
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. 19 जुलै 2022 रोजी त्यांना अटक केली होती. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केलेली. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.
हेही वाचा:
ऐश्वर्याच्या लेकीने जिंकली चाहत्यांची मनं; ‘त्या’ कृतीमुळे नेटकऱ्यांनी केले कौतुक





