Sangram Thopate : माजी आमदार संग्राम थोपटेंना मिळालं मोठं गिफ्ट! मंत्रिमंडळ बैठकीत ‘राजगड’ कारखान्याला अभय

Sangram Thopate : गेल्या काही महिन्यांपूर्वी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मोठा निर्णय घेत भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला. आता त्यांच्याशी संबंधित असलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याबाबात राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याशी संबध अलेल्या राजगड कारखान्याला राज्य सरकारकडून अभय मिळालं आहे.
या साखर कारखान्यासाठी ४६७ कोटी रुपयांच्या कर्जाला हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता पुणे जिल्ह्याच्या भोरमध्ये अनंतनगर निगडे येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या ‘मार्जिन मनी कर्जा’ स मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
त्यानुसार राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्य सरकारमार्फत सहकारी साखर कारखान्यास प्रतिदिन ३५०० मे. टन गाळप क्षमता प्रकल्प उभारणीसाठी ६० केएनपीडी डिस्टलरी प्रकल्प, १२ मेगावॉट निर्मिती वीजप्रकल्प आणि पाच टन सीएनजी गॅस प्रकल्प या दृष्टीने खेळत्या भांडवलासाठी ४६७. ७६ कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
अजित पवार संग्राम थोपटे राजकीय संघर्ष
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीवेळी तत्कालीन काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार केला होता. सुळे यांना या मतदार संघातून चांगले मतदान झाले होते. त्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. दरम्यान, थोपटे यांच्या कारखान्यास मंजूर झालेल्या ८० कोटींच्या कर्जाला स्थगिती देण्यात आली होती.
अवघे काही महिने पूर्ण अन्….
त्यानंतर संग्राम थोपटे यांनी भोर वेल्हा आणि मुळशी विधानसभेसाठी निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात महायुतीतीचे उमेदवार शंकर मांडेकर उभे होते. मांडेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि या मतदार संघातून ते विजयी झाले. त्यानंतर कारखाना अडचणीत असल्याचं कारण सांगत संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा हात सोडून आपल्या हाती कमळ घेतलं. त्यांना भाजप पक्षात प्रवेश करून अवघे काही महिने पूर्ण झाले असून, त्यांच्याशी संबधित असणाऱ्या राजगड सहकारी साखर कारखान्याबाबत मोठा निर्यय घेण्यात आला आहे.
अजित पवारांचं प्रश्न, फडणवीसांचे उत्तर…
मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत बंद पडलेल्या कारखान्याला कर्जाची हमी का द्यायची, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत उपस्थित केल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अशा प्रकारची हमी इतर कारखान्यांना दिल्याची भूमिका त्यांनी मांडली.
हेही वाचा : “काही लोक तुमच्यावर फारसे खूश नाहीत” ; फिजीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींना असे का म्हटले ? वाचा





