मुंबई – बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता जाधव यांना हृदय विकाराचा झटका आला.
त्यानंतर जाधव यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. काही कामानिमित्त नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले असता जाधव यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर हृदय विकाराचा सौम्य झटका आल्याचे समजते.
जाधव यांना आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती सध्या स्थिर आहे. यादरम्यान जाधव यांनी रुग्णालयात जाताना एक व्हिडीओ करत आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये जाधव म्हणतात
“मला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी आधी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू”