मोठी बातमी…! माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

परभणी : परभणीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आलोक चौधरी असं मारहाण करण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आहे. याप्रकरणी चौधरी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दिली बाबाजानी दुर्राणी यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पाथरी नगरपरिषदेमध्ये आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, मुख्याधिकारी कदम यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची व १४४ मालमत्ताधारकांची साई बाबा विकास आराखड्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांनी पाथरी येथील घरकुल आणि शॉपिंग काम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
दरम्यान, ही बैठक पार पडल्यानंतर सर्व जण खाली येत असताना माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नगर परिषदेचे गेट जवळ शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकारामुळे पाथरीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आलोक चौधरी यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन त्या अनुषंगाने बाबाजानी दुर्रानी आणि इतर ३ असे एकुण ४ जणावर विविध कलमान्वये ज्यात सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की, मारहाण, अश्लील शिवीगाळ, धमकी देणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





