सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन; कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर हृदयविकाराचा धक्का

Mahesh Kothe | सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. महेश कोठे मित्रांसह उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळयासाठी गेले होते. प्रयागराज येथे मंगळवारी सकाळी स्नान करत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि यात त्यांचे निधन झाले आहे. महेश कोठे यांच्या निधनानंतर सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे.
महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली निवडणूक लढवली होती. मात्र, विजय देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे सध्या आमदार आहेत. महेश कोठे यांनी सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. ते सोलापूर महापालिकेच सर्वात तरुण महापौर होते. Mahesh Kothe |
महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर महेश कोठे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते देखील होते. Mahesh Kothe |
हेही वाचा:





