10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण : शिरसवडीच्या माजी उपसरपंचाची उत्तरप्रदेशमधून सुटका

वाघोली : केसनंद येथून ३९ वर्षीय व्यक्तीचे अपहरण करुन नेपाळ बॉर्डर नजदीक उत्तरप्रदेशला घेऊन जावून १० लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून अपहरण केलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली आहे. लोणीकंद तपास पथकाने उत्तरप्रदेश सिद्धार्थनगर येथे जाऊन कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील बिवरी गावातील फिर्यादी यांचा बिवरी येथे शेती व प्लॉटींगचा व्यवसाय असुन आरोपीतांनी त्यांचे प्लॉटींगमध्ये जागा खरेदी करुन अॅडव्हॉन्स रक्कम दिलेली होती, बाकी राहीलेली रक्कम देण्याच्या बहाण्याने आरोपीतांनी फिर्यादी यांना २४ मार्च रोजी फोन करुन केसनंद येथे बोलावून तेथुन शिरसवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेश दगडे यांचे खंडणी उकळण्याच्या उद्देशाने बळजबरीने अपहरण करून उत्तरप्रदेश येथे घेऊन गेले. दगडे यांना सुखरुप सोडण्याकरिता त्यांच्या कुटुंबीयांकडे १० लाख रुपयांची मागणी केली तसेच पैसे दिले नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे नेपाळ बॉर्डर नजदीक सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश येथून दगडे यांना सुखरूप ताब्यात घेतले व दोन आरोपितांना देखील अटक केली. १० लाख खंडणी पैकी आरोपीतांनी एक लाख रुपये अकाऊंटवर स्विकारलेली रक्कम तात्काळ सिझ करण्यात आली आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त रोहीदास पवार , सहा. पो. आयुक्त येरवडा विभाग किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशन पो नि गजानन पवार, पोनि गुन्हे तटकरे, पो नि गुन्हे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सपोनि निखील पवार, पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, सफी मोहन वाळके, पो हवा बाळासाहेब सकाटे, पो ना कैलास साळुके, विनायक साळवे, अजित फरांदे, सुधीर अहिवळे,सागर शेडगे, पांडुरंग माने, अमोल ढोणे, बाळासाहेब तनपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे यांनी आहे.





