S Sreesanth Father Dies : माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत यांच्या वडिलांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
S Sreesanth Father Dies : शांताकुमारन नायर यांच्यावर केरळमधील लिसी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर श्रीसंत यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

S Sreesanth Father Dies : माजी भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंत यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीसंत यांचे वडील व्ही. शांताकुमारन नायर यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
शांताकुमारन नायर यांच्यावर केरळमधील लिसी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर श्रीसंत यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
पार्थिव रुग्णालयातील शवागृहात (S Sreesanth Father Dies)
मिळालेल्या माहितीनुसार, शांताकुमारन नायर यांचे पार्थिव सध्या रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांचे काही नातेवाईक परदेशात असल्याने ते भारतात परतल्यानंतर पार्थिव केरळमधील कोठामंगलम येथील त्यांच्या पैतृक निवासस्थानी नेण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शांताकुमारन नायर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
LIC मध्ये बजावली दीर्घकाळ सेवा (S Sreesanth Father Dies)
व्ही. शांताकुमारन नायर यांनी भारतीय जीवन विमा महामंडळात (LIC) दीर्घकाळ सेवा बजावली होती. ते संस्थेत प्रादेशिक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह केरळमध्ये वास्तव्यास होते.
एस. श्रीसंत यांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः वडिलांचा मोठा वाटा होता. वेगवान गोलंदाज म्हणून श्रीसंत यांनी भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. देशासाठी खेळताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली.
२०२२ मध्ये घेतली क्रिकेटमधून निवृत्ती (S Sreesanth Father Dies)
एस. श्रीसंत यांनी २०२२ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाकडून त्यांनी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांत प्रतिनिधित्व केले.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत श्रीसंत यांनी २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्यांनी अनुक्रमे ८७, ७५ आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत.
BRICS Summit: शी जिनपिंग भारतात दाखल; BRICS परिषदेत आज काय घडणार?





