ईडीने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनला बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय ?

former cricketer Mohammad Azharuddin । टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोहम्मद अझरुद्दीनला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवले आहेत. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, असोसिएशनमध्ये 20 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. अझरुद्दीनला आज ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. अझरुद्दीनची सप्टेंबर 2019 मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशन (HCA) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. जून 2021 मध्ये त्याला आपले पद सोडावे लागले होते.
निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहे.
स्टेडियम बांधकामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या म्हणण्यानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामात आर्थिक अनियमितता केली होती. त्यांनी खासगी कंपन्यांना चढ्या दराने कंत्राटे देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी ईडीने तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे.
क्रिकेटपटूतून राजकारणी झालेले अझरुद्दीन २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर मुरादाबाद, यूपी येथून खासदार झाले होते. 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी राजस्थानमधून लढवली होती, मात्र निवडणूक त्यावेळी ते जिंकून आले नाही.
हे वाचले का ?





