माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे निधन; अखेर कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Anshuman Gaikwad Passed Away | भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या 71 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. अंशुमन गायकवाड हे दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू होते. मागील महिन्यात ते लंडनहून भारतात परतले होते. गायकवाड यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले होते.
तर विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयला ‘ब्लड कॅन्सर’ने ग्रस्त असलेल्या अंशुमन गायकवाडला मदत करण्याचे आवाहन केले होते. अंशुमन गायकवाड यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुख: व्यक्त केले आहे.
Shri Anshuman Gaekwad Ji will be remembered for his contribution to cricket. He was a gifted player and an outstanding coach. Pained by his demise. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2024
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले
अंशुमन गायकवाड यांनी 1975 ते 1987 दरम्यान भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते भारतीय संघाचे प्रशिक्षक देखील झाले होते. गायकवाड प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघ 2000 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेता ठरले होते. पाकिस्तानविरुद्ध केलेली 201 धावा ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च खेळी होती. Anshuman Gaikwad Passed Away |
अंशुमन गायकवाड यांनी 27 डिसेंबर 1974 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1984 च्या शेवटच्या दिवशी इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या कोलकाता कसोटीत त्यांचा शेवटचा कसोटी सामना होता. गायकवाड यांनी भारतासाठी 15 एकदिवसीय सामन्यांमध्येही भाग घेतला, ज्यात त्यांच्या नावावर 20.69 च्या सरासरीने 269 धावांचा रेकॉर्ड आहे. Anshuman Gaikwad Passed Away |
अंशुमन गायकवाड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गायकवाड यांना जून 2018 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 15 एकदिवसीय सामने खेळले. या काळात इतर फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या गोलंदाजांचा अंशुमन गायकवाड मोठ्या हिमतीने सामना करत असते. परंतु आता अंशुमन गायकवाड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. Anshuman Gaikwad Passed Away |
हेही वाचा:
हानियाच्या हत्येनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘…सर्वांचा हिशोब करणार’





