Israel Hamas War । इस्रायलने इराणवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत इस्रायलने हल्ला करत हमास प्रमुख इस्माईल हानियाला ठार केले.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने एका निवेदनात पुष्टी केली आहे की, तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्यावर हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्यांच्या एका रक्षकाचा मृत्यू झाला. यामध्ये हिजबुल्लाचे वरिष्ठ कमांडर फुआद शुकरही मारले गेले. लेबनॉनमध्ये प्रवेश केल्यानंतर इस्रायलने फुआद शुकरची हत्या केली. हानियाच्या हत्येत इस्रायलचा हात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी (31 जुलै) पहिल्यांदाच या हत्येबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, इस्रायलने गेल्या काही दिवसात शत्रूंना जोरदार झटका दिला आहे.
Israel Hamas War । इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले…
राष्ट्राला संबोधित करताना नेतान्याहू यांनी हानियाच्या हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याचा दावा केला नाही. तसेच इस्रायलचा या हत्येशी संबंध असल्याचे नाकारलेही नाही. ते म्हणाले,’तीन आठवड्यांपूर्वी आम्ही हमासचे लष्करी प्रमुख मोहम्मद डेफ यांना मारले. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही हुथी बंडखोरांना लक्ष्य केले, जे हवाई दलाने केलेल्या सर्वात दूरच्या हल्ल्यांपैकी एक होते. काल आम्ही हिजबुल्लाचे लष्करी प्रमुख फुआद शुकर यांच्यावर हल्ला केला.’ असं म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.
Israel Hamas War । नुकसान करणाऱ्यांचा हिशोब करू
सीएनएनच्या वृत्तानुसार, नेतन्याहू म्हणाले की, ‘इस्रायलला आव्हानात्मक दिवसांचा सामना करावा लागत आहे आणि जे नुकसान करतात त्यांचा आम्ही हिशोब बरोबर करणार आहोत. हा आव्हानात्मक काळ आहे. बेरूतकडून धोका आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत. आम्हाला जर कोण नुकसान पोहचवले, आमच्या मुलांची हत्या करेल, आमच्या नागरिकांना मारेल तसेच आमच्या देशाला हानी पोहोचवतो त्यांना आम्ही सोडणार नाही त्याच्याबरोबर आम्ही स्कोअर सेट करू, इस्त्रायल आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत लढत राहील.’ अस म्हणत त्यांनी अपली भूमिका स्पष्ट केली.
हे वाचले का ?
दिल्लीत पावसाचा तांडव..! नाल्यात पडून माय – लेकाचा ‘मृत्यू’