Maharashtra politics : मोठी राजकीय घडामोड! भाजपच्या माजी खासदाराचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Maharashtra politics : पुण्याच्या राजकीय वर्तुळातून आजची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे

Maharashtra politics : पुण्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी आपल्या पुत्र विक्रम काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. पुण्यातील जिजाई निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. (Maharashtra politics)
या पक्षप्रवेश सोहळ्याला पार्थ पवार आणि जय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Maharashtra politics)
पक्षप्रवेशावेळी संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात काम करण्याची भूमिका मांडली. पुणे शहर आणि जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. (Maharashtra politics)
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. विक्रम काकडे यांचे नाव विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चेत असताना झालेल्या या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra politics)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही या पक्षप्रवेशामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात पक्षाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा मानला जात असून, पुण्यातील राजकारणात त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. (Maharashtra politics)





