टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK ) यांच्यातील सामन्यात विराट कोहलीची ( Virat Kohli ) शानदार खेळी क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाली. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानची पकड मजबूत होती, पण अखेर विराट कोहलीच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना जिंकला. यानंतर विराटाच्या मॅच-विनिंग खेळीसाठी सर्वांनी त्याचे कौतुकही केले.
“ICC भारतीय संघाला मदत करतंय…”, पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी बरळला
मात्र पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफला त्याच्याच डोक्यावरून विराटने मारलेल्या षटकाराने सर्वांचेच मन मोहून टाकले. विराट कोहलीने ( Virat Kohli ) बॅकफूटवर जाऊन गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेटला शानदार षटकार ठोकला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क टेलरने विराटच्या या षटकार संदर्भात मोठं विधान केले आहे.
वाइल्ड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्समध्ये एका संवादादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मार्क टेलर विराट कोहलीच्या ( Virat Kohli ) त्याच षटकारांबद्दल म्हणाला की, “मला अजूनही विश्वास बसत नाहीय की विराट कोहलीने एमसीजी मैदानावर हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर स्ट्रेटला षटकार कसा मारला. जिथे त्याने बॅकफूटवर जाऊन सरळ बॅटने तो फटका खेळला होता. हरिस रौफला त्याच्याच डोक्यावर मारलेला षटकार ९० मीटर लांब गेला होता. तो चेंडू षटकारासाठी कसा गेला हे मला अजूनही समजू शकलेले नाही. मला वाटतं की, मी जर त्याप्रकारचा शॉट मारला तर त्याकडे मिड-ऑनचा खेळाडू झेल घेण्यासाठी धावत असेल.”
विराट कोहलीने ( Virat Kohli ) षटकार मारलेल्या त्या शॉटचे क्रिकेट जगतात सर्वांनीच कौतुक केले. त्याचबरोबर त्या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारासह नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. विराट