योगी सरकारला आपल्याच आश्वासनाचा विसर; आक्रमक शेतकरी “हे” पाऊल उचलण्याच्या तयारीत

नोएडा – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना जी आश्वासने देण्यात आली होती त्याच्या पुर्ततेकडे योगी सरकारचा दुर्लक्ष झाले असून या आश्वासनांची पुर्तता झाली नाही तर तेथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा मोठे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय किसान युनियनच्या एका वेगळ्या गटाने उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. उसाची थकबाकी, सुरळीत वीजपुरवठा, वीजबिल माफी आदि मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले.
ही सगळी आश्वासने त्वरीत पूर्ण करा अन्यथा आम्हाला पुन्हा उग्र आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा भारतीय किसान युनियनचे दिगंबर सिंह यांनी दिला आहे.
यंदा राज्यातील ऊस गाळप हंगाम ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासूनच?
भारतीय किसान युनियनचा हा गट वर्षभरापूर्वी स्थापन झाला असून या गटाने राकेश टिकैत यांच्या गटापासून फारकत घेत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. हा गट संयुक्त किसान मोर्चाचा भाग नाही, असे या गटाचे दुसरे नेते सौरभ उपाध्याय यांनी म्हटले आहे.
धक्कादायक! पत्नीसोबतचा फोटो झाडाखाली ठेवून पतीची गळफास घेत आत्महत्या





