Satara News : मोकाट कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेल्या सांबरास वनविभागाने दिले जीवदान
Updated On:

महाबळेश्वर : महाबळेश्वर पासून ७ किमी अंतरावरती असणाऱ्या मेट गुताड हद्दी मधील हॉटेल टी.ओ.जी नजिकच्या जंगल परिसरात मधून मोकाट कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेले सांबर हरीण जीव वाचविण्याच्या आकांताने येथे राहणाऱ्या संतोष धनावडे यांच्या घरात शिरले.
संतोष धनावडे व हॉटेल टी.ओ.जीचे व्यवस्थापक सूर्यकांत दळवी यांनी मोकाट कुत्र्यांना हिसकावून लावत सांबरास सुरक्षित स्थळी ठेवले व सदरची बाब वनविभागाला कळविली. या वेळी वनविभागाचे संतोष बावळेकर घटना स्थळी दाखल झाले.
यानंतर घाबरलेल्या सांबरास पाणी दिले तसेच झालेल्या किरकोळ जखमांवरती औषध उपचार देखील केले. वनक्षेत्रपाल गणेश महांगडे यांच्या मार्गदर्शना खाली वनपाल रणजीत काकडे वनरक्षक तानाजी केळघणे, लहू राऊत याचबरोबर वनविभागाचे संतोष बावळेकर यांनी या जखमी सांबरास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.





