अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार; कारेगाव येथील घटना

रांजणगाव गणपती : “मी तुझ्यावर खुप प्रेम करतोय, तु मला खुप आवडतेस” असे म्हणुन जबरदस्तीने दोन वेळा शारीरीक संबंध ठेवून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील मल्हार हिल्स येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कारेगाव येथील मल्हार हिल्स येथे अल्पवयीन मुलाने (वय १६ वर्ष) फिर्यादी यांची मुलगी (वय १४ वर्ष ११ महीने रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) तिचे सोबत इन्स्टाग्रामवर ओळख करून मैत्री केली. त्यानंतर कारेगाव येथील त्याच्या राहत्या घरी घेवुन जात “मी तुझ्यावर खुप प्रेम करतोय, तु मला खुप आवडतेस” असे म्हणुन जबरदस्तीने दोन वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
तसेच सदर गोष्ट कोणाला सांगितली तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले करत आहेत.





