Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी बांगलादेशातील बौद्ध आणि चकमा यांच्यासह अल्पसंख्याक समुदायावर होत असलेला हिंसाचार रोखण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती पावलं उचलण्याची विनंती केली आहे. हे पत्र त्यांनी पंतप्रधानांसह परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनाही पाठवलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात नेमकं काय लिहिले?
“बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याक आणि आदिवासी लोकांविरुद्ध विशेषतः बौद्ध आणि चकमा यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल मी तुम्हाला पत्र लिहित आहे. बांगलादेशातील हिंदूवरील हिंसाचाराच्या समर्थनार्थ आणि निषेधार्थ भारत सरकारने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. पण, बौद्ध आणि चकमा या अल्पसंख्याक समुदायाविषयी भूमिका घेण्यात आलेली नाही”, असे आंबेडकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
In addition to writing to the Hon’ble Prime Minister, I also wrote to the Minister of External Affairs @DrSJaishankar regarding the violence on Buddhists and Chakmas in Bangladesh.
In the letter, I have requested for details of diplomatic interventions undertaken and assistance… pic.twitter.com/ZTnFVkOIqr
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 12, 2025
“हिंसाचार आणि भेदभावाबद्दल चिंता वाटते”
“बांगलादेशात बौद्ध आणि चकमांवरील हिंसाचार आणि भेदभावाबद्दल खूप चिंता वाटते. त्यांच्या मदतीसाठी आणि हस्तक्षेपासाठीच्या विनंतीकडे भारत सरकार आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान श्रीमती शेख हसीना यांना त्यांच्या पदावरून अनैतिकरित्या काढून टाकल्यापासून बौद्धांवरील हल्ले, धार्मिक स्थळांची तोडफोड, स्थानिक चकमा गटांवर हल्ले, त्यांची दुकाने, घरे जाळणे यासारख्य घटना पाहिल्या आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. Prakash Ambedkar |
याद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी बांगलादेशातील सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या विशेषतः बौद्ध आणि चकमांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित योग्य ती पावले उचलण्याची विनंती या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Prakash Ambedkar |
हेही वाचा:
‘… तर मी मोबाइल टॉवरवर जाऊन स्वत:ला संपवून घेतो’, संतोष देशमुख यांच्या भावाचा इशारा