Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप 1 आरोपी फरार आहे. या हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर कोका लावण्यात आला आहे. मात्र, खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कराडवर देखील मकोका लावण्यात यावा व या गुन्ह्यातील आरोपी करावी अशी मागणी सातत्याने केली आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी देखील ही मागणी करत आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला आहे. आरोपीला मकोका आणि 302 आरोपामध्ये नाही घेतलं तर माझे कुटुंब मोबाईल टॉवर चढून आंदोलन करेल, त्या टॉवरवर मी स्वत:ला संपून घेतो, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात यावा अशी मागणी केली आहे.
धनंजय देशमुख म्हणाले की, आरोपीला मकोका अंतर्गत आणि 302 च्या गुन्ह्यात घेतलं नाही तर मी आणि माझे कुटुंब वैयक्तिक आंदोलन मोबाईल टॉवरवर करणार आहोत. त्या टॉवरवर जाऊन मी स्वत:ला संपवून घेतो. याचं कारण आहे की हे आरोपी जर सोडले तर उद्या हे माझाही खून करतील.
हे आरोपी सोडले तर माझा हे खून करतील. माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. माझ्या भावालाही वाटेल की, आपला भाऊ स्वत:संपला. त्यालाही समाधान वाटेल की अशा पद्धतीने मारला गेला नाही, असेही ते म्हणाले.
आज 35 दिवस झाले आहेत. आम्ही सर्व यंत्रणा ते मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला आहे. काल रात्रीपर्यंत मला सगळी माहिती मिळणे अपेक्षित होते, सगळे सीडीआर निघालेत का ? पुरावे सगळे नष्ट झाल्यानंतर मला सगळं कळणार असेल तर माझ्या न्याय मागण्याला काय अर्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.