Bangladesh Crime News : बांगलादेशात निवृत्त हिंदू शिक्षकासह कुटुंबीयांची हत्या; दोघांना अटक
बांगलादेशच्या रंगपूर शहरात (Bangladesh Crime News) एका निवृत्त हिंदू शाळेतील शिक्षकासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे.

Bangladesh Crime News : बांगलादेशच्या रंगपूर शहरात (Bangladesh Crime News) एका निवृत्त हिंदू शाळेतील शिक्षकासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. गणपती चक्रवर्ती (६५), प्रीतिलता चक्रवर्ती (५०), अगामी चक्रवर्ती प्रार्थी (२३) आणि प्रियम चक्रवर्ती (१२) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी या हत्याकांडात सहभागी असल्याप्रकरणी मुघ्धो आणि सिद्धार्थ नावाच्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे चुलत भाऊ आहेत. गुरुवारी रात्री हे दोघे शेजारच्या इमारतीमधून चक्रवर्तीच्या घराच्या (Bangladesh Crime News) छतावर घुसले आणि तिथे त्यांनी याबा हे अमली पदार्थ नेले होते. आवाज ऐकून गणपती चक्रवर्ती छतावर गेले आणि त्यांनी त्या दोन माणसांना तिथे त्यांच्या उपस्थितीबद्दल विचारणा केली.
आपला पर्दाफाश टाळण्यासाठी संशयितांनी त्याच्या खांद्यावर असलेल्या गमछ्याने चक्रवर्ती यांचा गळा दाबला, असे रंगपूर महानगर पोलीस आयुक्त मोहम्मद अब्दुल मबूद यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. आवाज ऐकून त्यांची पत्नी वरच्या मजल्यावर गेली. संशयितांनी जिन्यावरच कापडाच्या तुकड्याने त्यांचाही गळा दाबून खून केला. या घटनेत त्या जोडप्याची मुलगी आणि मुलगा यांचाही मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजता रंगपूर शहरातील (Bangladesh Crime News) दासपारा भागातील त्यांच्या कुलूप लावलेल्या घरातून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. कुटुंबाचे कोणाशीही वाद किंवा वैर नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.






