मुळशी तालुक्यात प्रथमच मुळशी आपत्ती व्यवस्थान समितीच्या वतीने लहान मुलांसाठी 24 तास कार्डियाक रुग्णवाहिका आजपासून मुळशीकर नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. या कार्डियाक रुग्णवाहिका मधून ग्रामीण भागातील जन्मलेल्या मुलापासून ते पाच महिन्याच्या बालकापर्यंत तसेच त्या पुढील बालकांपासून ते प्रौढापर्यंत एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आपत्कालीन काळात कार्डियाक रुग्णवाहिका वापर होणार आहे. ही रुग्णवाहिका आय. सी. यु. असलेले रुग्णवाहिका असून यात इंक्युबेटर,मॉनिटर, सक्षन मशीन, सिरींज पंप, डीपीप लेटर, न्यू नेटल व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, आय.सी.यु.मधील संपूर्ण साहित्य, औषधे व सोबत एक डॉक्टर उपस्थित राहणार असून ही सेवा नागरिकांना अल्प दरात उपलब्ध राहणार आहे मुळशी तालुक्यातील सिंबोयसिस हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय पौड येथे ही रुग्णवाहिका 24 तास डॉक्टर सहित उपलब्ध राहणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी मोबाईल नंबर 9067568280/ 8390336688 वरती संपर्क करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी मीना इसवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा मुळशी आपत्ती व्यवस्थान च्या वतीने चालवण्यात येणार आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित आपत्ती व्यवस्थानचे प्रमोद बलकवडे, चेतन कुंभार, दादासाहेब तांबे,डॉ.अशोक शेडगे,डॉ वंदना शिंदे, कृतांजली कांबळे, डॉ साक्षी विठ्ठलकर, डॉ अरुणा कावरे, डॉ ऐश्वर्या शिंदे, डॉ ज्योती शिंदे, गणेश लटके, संतोष भरम,विठ्ठल पवार, विकास खैरे, संतोष क्षीरसागर, उपस्थित होते. कार्डियाक रुग्णवाहिका ही 24 तास सेवा देणार आहे. यामध्ये डॉक्टर ,औषधे उपलब्ध असणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी 9067568280, 8390336688 या नंबर वरती संपर्क करावे तसेच रुग्णवाहिका सिंबोयसिस हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयात पौड येथे रुग्णवाहिका उपस्थित राहणार असून ही सेवा मुळशी आपत्ती व्यवस्थानच्या वतीने अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुळशी मध्ये प्रथमच आपत्कालीन काळात लागणारी कार्डियाक रुग्णवाहिका मुळशी आपत्ती व्यवस्थानच्या वतीने सेवेत दाखल झाली आहे. याचा नक्कीच जीवनदान मिळण्यासाठी बालकांना व नागरिकांना उपयोग होईल. रणजित भोसले (तहसिलदार मुळशी)