पुणे | जुन्या पेन्शनसाठी जि. प. कर्मचाऱ्यांचा मोर्चा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय सामूहिक रजाही घेतली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प होते.,
जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणे व जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक यांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यामागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गातील कर्मचारी व शिक्षक संवर्गीय कर्मचारी नवीन जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद समन्वय संघटनेचे शेखर गायकवाड, उमाकांत कुलकर्णी, किशोर कुलकर्णी, प्रदीप गोलांडे, इंद्रजित जाधव, सुहास संचेती, प्रकाश जामदार यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले.





