‘हम आपके हैं कौन’साठी माधुरी नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती; दिग्दर्शकाचा खुलासा

Hum Aapke Hain Koun Film | बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका असलेला ‘हम आपके हैं कौन’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र आजही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते.
या सिनेमाचं दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी एक मोठा खुलासा केला आहे. माधुरी दीक्षित या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती, तर अभिनेत्री करिश्मा कपूरला या चित्रपटासाठी कास्ट केले जाणार होते, असे चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सांगितले.
‘हम आपके हैं कौन’चे दिग्दर्शक सूरज बडजात्या ‘इंडियन आयडल 15’ या शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी या सिनेमाबद्दल एक खास गोष्ट प्रेक्षकांना सांगितली. दिग्दर्शक सूरज बडजात्या म्हणाले, “करिश्माने मला ‘प्रेम कैदी’ सिनेमा दाखवण्यासाठी फोन केला होता. तो तिचा पहिला सिनेमा होता. मी तिचा चित्रपट पाहिला आणि घरी येऊन माझ्या वडिलांना सांगितलं की, मी करिश्माचा ‘प्रेम कैदी’ सिनेमा पाहिला. तिच्यात किती एनर्जी आहे. आता आपण ‘हम आपके हैं कौन’ लिहित आहोत तर, करिश्माला बोलावून पाहुयात.” Hum Aapke Hain Koun Film |
View this post on Instagram
“त्यावेळी वडिलांनी मला सांगितलं की, करिश्मा अजून खूप लहान आहे. चित्रपटात मोहनीश यांच्या बाळाचा स्वीकार करण्यासाठी अभिनेत्री तिच्या प्रेमाचा त्याग करण्यास तयार होते, असा सीक्वेन्स आहे. हे आपण तिला कसं काय सांगू शकतो. एका लहान मुलीवर हे खूप मोठं ओझं आहे. म्हणूनच आपल्याला अशा व्यक्तीची गरज आहे जी तिच्या खांद्यावर ही जबाबदारी घेऊ शकेल.” दिग्दर्शकाचा खुलासा ऐकून करिश्मा वयाने थोडी मोठी असते तर, कदाचित या भूमिकेसाठी संधी मिळाली असती अशा भावना व्यक्त करते.
दरम्यान, ‘हम आपके हैं कौन’ सिनेमात सलमान खान, माधुरी दीक्षितसह रेणुका शहाणे, मोहनीश, अनुपम खेर, रीमा लागू, अलोकनाथ यांनी उत्तम भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कथा आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. Hum Aapke Hain Koun Film |
हेही वाचा:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभ मेळ्यात उपस्थित; त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान





