#Football : मँचेस्टर क्लबचे कारवाईला आव्हान
Updated On:

लंडन : इंग्लिश प्रीमियर लीग (इपीएल) मधील सर्वात यशस्वी व श्रीमंत संघ अशी ओळख असलेल्या मँचेस्टर सिटी क्लबवर युरोपियन फुटबाॅलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
युरोपियन फुटबाॅल महासंघाने (यूएफा) केलेल्या या कारवाईमुळे मँचेस्टर सिटी क्लबला युरोपमधील कोणत्याही स्पर्धांमध्ये पुढील दोन वर्षे खेळता येणार नाही. महासंघाच्या या कारवाईविरोधात दाद मागणार असल्याचे मँचेस्टर सिटी क्लबने स्पष्ट केले आहे.
मँचेस्टर सिटी क्लबवर दोन वर्षे बंदी व तीन कोटी युरो इतक्या प्रंचड रक्कमेचा दंड लावण्यात आला आहे. या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागण्यात येणार आहे.




