Rajshri Deshpande : ब्रेस्ट कॅन्सरवर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अभिनेत्री राजश्री देशपांडेची सोशल मीडियावरुन पोस्ट; म्हणाली “रडू कोसळल्याचा क्षण…”
Rajshri Deshpande : अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, तिने सोशल मीडियावरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Rajshri Deshpande : अभिनेत्री राजश्री देशपांडेने ‘सेक्रेड गेम्स’, ‘मंटो’ आणि ‘ब्लॅक वॉरंट’ यांसारख्या कलाकृतीतून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. नुकतीच तिच्यावर स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर अभिनेत्रीने याबद्दलचा अत्यंत भावनिक सोशल मीडियावरुन पोस्ट करत शेअर केला आहे.
अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिला तिच्या आजाराबद्दल समजले, तेव्हा ती रुग्णालयात पूर्णपणे एकटी होती आणि पूर्णपणे खचून गेली होती. ती म्हणाली की, रुग्णालयात एकटी बसून रडू कोसळल्याचा क्षण तिला आजही आठवतो. त्यावेळी तिच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्यापैकी एकाचेही स्पष्ट उत्तर तिच्याकडे नव्हते.
पोस्टमध्ये पुढे राजश्री देशपांडेने म्हटले आहे की, या कठीण काळात स्वतःला सांभाळणे सोपे नव्हते, पण हळूहळू तिने धैर्य निर्माण केले. तिने तिच्या आजाराचा आणि उपचारांचा संपूर्ण प्रवास सर्वांसमोर उघडपणे मांडला, जेणेकरून लोकांना त्याबद्दल माहिती व्हावी आणि ते घाबरू जाऊ नयेत, हा त्यामागचा उद्देश.
अभिनेत्रीला ग्रेड 1 स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते, तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता ती बरी होण्याच्या मार्गावर आहे.
View this post on Instagram
राजश्री देशपांडे हिच्याबद्दल…
राजश्री देशपांडेने 2012 मध्ये ‘तलाश’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘किक’, ‘मॉम’, ‘मंटो’, ‘द स्काय इज पिंक’ आणि ‘जोरम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तिने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची एक विशेष ओळख निर्माण केली.
राजश्रीने टेलिव्हिजनच्या जगातही आपली छाप सोडली आहे. ती ‘कुछ तो लोग कहेंगे’ आणि ’24: इंडिया’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली. मात्र, तिला नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेबसिरीज ‘सेक्रेड गेम्स’मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.





