Anjali Damania : राज्यात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरुन पाय उतार व्हावे लागले. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर काल 27 मार्च रोजी रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनामा पत्रात ‘मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. त्याचा स्विकार करावा’ असे म्हटले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया एक्सवरुन ट्वीट करत रुपाली चाकणकरांवर टीका करत एक ओळीचा राजीनामा असा सवाल केला आहे. एक ओळीचा राजीनामा….. सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील “मी तर वाटच पाहत होते” हा राजीनामा समर्पित …… डॉ. संपदा मुंडेंना, ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न ह्यांनी केला. त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही. त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली… pic.twitter.com/ZsFQM39F8s — Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 28, 2026 रुपाली चाकणकरांनी ट्वीटमध्ये काय म्हटले आहे? राजीनामा दिल्याचे पत्र रुपाली चाकणकरांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केले आहे. यासोबत त्यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते… pic.twitter.com/9awsGZmgJL — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 27, 2026 दमानियांची टीका रुपाली चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनामा पत्रावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. एक ओळीचा राजीनामा…..सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील “मी तर वाटच पाहत होते” हा राजीनामा समर्पित ……डॉ. संपदा मुंडे यांना त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही. त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली गेली. कर्माचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात भोगावं लागतं, असा निशाणा अंजली दमानिया यांनी साधला आहे. हेही वाचा : Varun Dhawan Daughter Health: मुलीच्या आजाराने वरुण धवन व्यथित; म्हणाला ‘साधं चालणंसुद्धा तिच्यासाठी कठीण’