अमूल पाठोपाठ मदर डेअरीच्या दुधाचेही दर वाढले
Updated On:

नवी दिल्ली – अमूल डेअरी पाठोपाठ मदर डेअरीनेही आपल्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ केली आहे. हे वाढीव दर उद्यापासून लागू होणार आहेत.
तथापि सुरुवातीच्या टप्प्यात ही दरवाढ केवळ दिल्ली आणि दिल्लीच्या परिसरातील दूधविक्रीतच केली जात असल्याचे मदर डेअरीने म्हटले आहे.
दिल्ली व एनसीआर परिसरात मदर डेअरीतर्फे रोज सुमारे तीन लाख लिटर दूध विकले जाते. अमूल ब्रॅंडच्या दुधाच्या दरातही मागच्या आठवड्यात अशीच दरवाढ जाहीर झाली आहे.





