Pimpri : आठवडाभरात तापमानात चढउतार शक्य

पिंपरी : आज दिवसभर शहराचे वातवरण ढगाळ राहिले असून, 21.2 कमाल तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय दररोज आकाश निरभ्र राहणार असून, सकाळी धुके पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळने वर्तविला आहे.
गेली काही दिवसांपासून शहरात सकाळी तापमानात बदल झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. पुढील आठवडाभरात सकाळी धुके पडणार असल्याचा अंदाज वेधशाळने वर्तविला आहे. शनिवारी (दि. 28) शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर रात्रीच्या हवेत गारवा वाढला होता, तर आज पहाटे दाट धुके पसरले होते. त्यानंतर दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात काही भागात काळे ढग दाटून आले होते.
दरम्यान, पुढील 24 तासांत शहरातील हवामान कोरडे, आकाश निरभ्र राहील. दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल. तर 31 डिसेंबरनंतर आकाश निरभ्र आणि कमाल व किमान तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे नवीन वर्षात थंडीचे पुरागमन होणार असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले.





