Heavy Rain : वादळी पावसानंतर मोठा पूर; ३९ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचे स्थलांतर
Heavy Rain : वादळामुळे झालेल्या अभूतपूर्व मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीने भीषण रूप धारण केले आहे.

Heavy Rain : दक्षिण चीनमध्ये मेसाक या उष्णकटिबंधीय वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हेंगझोऊ येथील एका जलाशयाचा धरण कोसळल्याने शहरात पाणी शिरले आणि त्यात सर्वाधिक २६ जणांचा बळी गेला. (Heavy Rain)
गुआंग्शी प्रदेशात अद्याप नऊ जण बेपत्ता आहेत. दरम्यान, तैवान आणि चीनचा पूर्व किनारा आगामी दिवसांत धडकणाऱ्या ‘बावी’ या नव्या टायफूनचा (चक्रीवादळाचा) सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत. (Heavy Rain)
हवामान केंद्राच्या माहितीनुसार, काही पूरग्रस्त भागांत ९० सेंटीमीटरपेक्षा जास्त विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे शाळा आणि इमारतींमध्ये हजारो लोक अडकले असून, ड्रोन आणि ५,७०० बोटींच्या साहाय्याने सुमारे १,३०,००० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (Heavy Rain)
गुईगांगमधील एका प्राणीसंग्रहालयातून १०० हून अधिक प्राणी बेपत्ता झाले आहेत, तर हेंगझोऊमध्ये फार्ममधून साप बाहेर पडल्यामुळे अँटी-व्हेनमचा साठा करण्यात आला आहे. (Heavy Rain)

सध्या पुराचे पाणी ओसरत असून रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा पूर्ववत करणे आणि निर्जंतुकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत आणखी पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Heavy Rain)





