चिंबळी : गेल्या पाच दिवसापासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दक्षिण भागातील अनेक गावांतील ओढ्या, नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. खेड तालुक्यातील चिंबळी, कुरूळी मोई, केळगाव, निघोजे परिसरात ओढ्याना पुर आहे. तर काही भागातील रत्स्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. दरम्यान, मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. परिणामी मोई हद्दीतील पूलवरून पाणी स्मशानभूमीत गेले आहे. मंहाळूगे पोलीसांकडून मोई पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिंबळी मोशी हद्दीत असलेल्या केटी बंधाऱ्यावरूनही ही पाणी वाहत असून नागरिकांना जाण्या येण्यासाठी हा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे.