Flood Update : महापुराचा हाहाकार..!105 भारतीयांसह 384 प्रवासी बेपत्ता, हेल्पलाइन क्रमांक जाहीर
Flood Update : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या भीषण महापुरामुळे मोठा अनर्थ घडला आहे.

Flood Update : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार, एकूण 384 प्रवासी बेपत्ता असल्याची नोंद झाली असून त्यामध्ये 105 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या यादीत 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत. मात्र, ही यादी प्राथमिक असून संबंधित प्रवाशांचा शोध आणि माहितीची पडताळणी सुरू आहे. (Flood Update)
कैलास मानसरोवर यात्रेकरूही बेपत्ता
बेपत्ता प्रवाशांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. ट्रॅव्हल एजन्सी, गाईड, स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. त्यामुळे ‘बेपत्ता’ म्हणजे मृत्यू झाला असे अद्याप मानता येणार नाही, असे पर्यटन मंडळाने स्पष्ट केले आहे. (Flood Update)
पूल, वाहने आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान
बुधवारी सकाळी भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे रसुवा येथील तिमुरे आणि सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहने, पूल, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा वाहून गेल्या असून जलविद्युत प्रकल्पांनाही फटका बसला आहे. बचावकार्य सुरू असून परिस्थिती अद्याप गंभीर आहे. (Flood Update)

5 जिल्ह्यांना हाय अलर्ट
रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवन या भागांतील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आणि नदीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने पुढील पुराचा धोका लक्षात घेऊन सतर्कता वाढवली आहे. (Flood Update)
मदतीसाठी हे हेल्पलाइन क्रमांक
नेपाळ पर्यटन मंडळाने आपत्कालीन मदतीसाठी खालील क्रमांक जाहीर केले आहेत.
1234 – टोल-फ्री आपत्कालीन सेवा
1144 – पर्यटन हेल्पलाइन
9851289445 – टुरिस्ट पोलिस
प्रभावित पर्यटकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. (Flood Update)




