एकच नंबर! निम्म्या किंमतीत मिळतोय ‘या’ कंपनीचा टॅब, सेलचा शेवटचा दिवस; ऑफर एकदा पाहाच

OnePlus Pad Offer: विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास करण्यासाठी व अभ्यासाठी टॅबलेट हे चांगले डिव्हाइस आहे. स्मार्टफोनच्या तुलनेत टॅबलेटचा अनेक कामांसाठी वापर करणे शक्य होते. तुम्ही देखील नवीन टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलचा फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये OnePlus च्या टॅबलेटला निम्म्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
OnePlus Pad ची किंमत आणि ऑफर्स
OnePlus Pad च्या 8GB+128GB व्हेरिएंटला 37,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिएंटला ला 39,999 रुपयात लाँच करण्यात आले होते. मात्र, फ्लिपकार्ट सेलवर टॅबलेट निम्म्या किंमतीत उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये या टॅबचे 12GB+256GB व्हेरिएंट फक्त 22,249 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याशिवाय, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अतिरिक्त 2,500 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. अशाप्रकारे, या टॅबला फक्त 19,749 रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
OnePlus Pad चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus च्या या टॅबमध्ये 11.6 इंच एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून, यात फुल एचडी+ रिझॉल्यूशन, 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 500 निट्स ब्राइटनेसचा सपोर्ट मिळेल. टॅब मीडियाटेक डाइमेंसिटी 9000 चिपसेटसह येतो. यामध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फायचा सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, EIS सपोर्टसह येणारा 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याद्वारे 30fps वर व्हीडिओ रेकॉर्ड करू शकता. तसेच, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
टॅबचे वजन फक्त 552 ग्रॅम आहे. त्यामुळे सहज कोठेही घेऊन जाणे शक्य आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 65 वॉट सुपरवूक चार्जिंग सपोर्टसह येणारी 9510mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये हेडफोन जॅक सपोर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे केवळ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळेल. दमदार साउंडसाठी यात डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह क्वाड स्पीकर सेटअप दिला आहे.





