Meghna Bordikar: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डीकरांकडून शेतकऱ्यांना दिलासा
Meghna Bordikar: राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला विश्वास

Meghna Bordikar: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त परभणीच्या वसमत रस्त्यावरील राजगोपालाचारी उद्यानात ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडला. ध्वजारोहणानंतर मार्गदर्शन करताना त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला.
परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:
NARENDRA MODI: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 76वा वाढदिवस; काशीमध्ये भाजपचा खास प्लॅन काय?





