काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ‘या’ सात उमेदवारांची नावं ‘फिक्स’; दोन महिला उमेदवारांनाही मिळणार संधी

Maharashtra Lok Sabha Election| लोकसभा निवडणुकींच्या अनुषंगाने काँग्रेसकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र उर्वरित जागा वाटपासाठी दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बुधवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यात प्रणिती शिंदे सोलापूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु अद्याप अधिकृतरित्या ते जाहीर करण्यात आलेले नाही.
बुधवारी दिल्लीत काँग्रेसची वरिष्ठ पातळीवर पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह वर्षा गायकवाड, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे नेते देखील उपस्थित होते. या बैठकीत एकूण सात जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेसकडून लोकसभेसाठी दोन महिलांची नाव निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, तर सोलापूर मधून प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आघाडीतील एकाही पक्षाने अद्याप उमेदवारी जाहीर केलेले नाही अद्याप चार ते पाच जागांवर पेच कायम आहे.
संभाव्य उमेदवार कोणते ?
दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत संभाव्य उमेदवार म्हणून पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, गडचिरोलीरमधून नामदेव किरसंड, कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, अमरावतीमधून बळवंत वानखेडे आणि भंडारा गोंदियामधून नाना पटोले यांची नावे समोर येत आहे.
हेही वाचा:
या देशाच्या पहिल्या समलिंगी पंतप्रधानांनी दिला ‘राजीनामा’ ? भारताशी आहे ‘खास कनेक्शन’





