Pimpri : पाच महिला बचतगटांना ‘मी सक्षम पुरस्कार’

कान्हे : सालाबादप्रमाणे याही वर्षी स्किलेट फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या “मी सक्षम ” या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. पुणे जिल्ह्यातील जे महिला बचत गट घरगुती व्यवसाय करून आर्थिक उत्पन्न मिळवतात व आपला आर्थिक स्तर उंचावतात अशा बचत गटाना संस्थेच्या वतीने पुरस्कृत करून सन्मानित करण्यात येते.
त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून बरेच बचत गट उपस्थित होते. त्यात आपल्या मावळ तालुक्यातील सर्वात जास्त म्हणजे 5 बचत गटांना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये ज्ञानराज महिला बचत गट कान्हे अध्यक्ष रुपालीताई सातकर , राजमाता जिजाऊ महिला बचत गट आंबेवाडी कान्हे अध्यक्ष संजनाताई सातकर,प्रगती महिला बचत गट ब्राम्हणवाडी अध्यक्ष सीमाताई बोऱ्हाडे, स्वामी समर्थ महिला बचत गट ब्राम्हणवाडी अध्यक्ष अश्विनीताई बोऱ्हाडे आणि हिरकणी महिला बचत गट वडगाव अध्यक्ष अर्चनाताई कुडे. अशा पाच गटांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
तसेच सदर बचत गटांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, त्यांना त्यांच्या मालाला मार्केट उपलब्ध करून देणे ह्या सर्व गोष्टींसाठी सौ. आरती भाळवणे यांना देखील स्किलेट फाउंडेशन तर्फे “विशेष मी सक्षम पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. त्यासाठी त्यांना सौ. वनमाला चौधरी मॅडम, डॉ. मिताली मोरे मॅडम, CA सौ.सोनाली सरिपल्ली मॅडम आणि श्रुती पाटोळे मॅडम यांचे मुख्य सहकार्य लाभले. कान्हे गावातील सर्व स्तरातून या बचत गटांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





