निवडणुकीच्या यशात पाच योजनांचा वाटा; विजयानंतर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
Updated On:

पुणे – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्षा निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना यांसह अन्य योजना महत्त्वपूर्ण ठरल्या, असे सांगत डाॅ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, की सरकारने समोर जे- जे प्रश्न आले, त्यावर तात्काळ निर्णय घेतले. शेतकऱ्यांना 10 युनिट्सपर्यंत वीजबिल माफी केली. जेष्ठ नागरिक, सिंचन प्रकल्प, अवकाळी पावसाने झालेले नुकसान या सर्वांत 15 हजार कोटींची मदत केली.





