पणजी – गोवा विधानसभेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी कॉंग्रेसने आपल्या पाच आमदारांना अज्ञातस्थळी हलवले आहे. या पक्षाच्या पाच आमदारांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपले उर्वरीत आमदार सुरक्षित ठिकाणी नेले आहेत.
कॉंग्रेसने आपल्या गटाच्यानेत्याची विरोधी पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता नवीन विरोधी पक्ष नेता निवडला जाणार आहे. 40 सदस्यीय गोवा विधानसभेत कॉंग्रेसचे एकूण 11 आमदार आहेत. त्यापैकी पाच कॉंग्रेस आमदार पक्षासोबत होते, तर इतर पाच आमदार पक्षाबाहेर पडण्याच्या स्थितीत आहेत.
उर्वरित एक आमदार ऍलेक्सो सिक्वेरा हे मात्र त्यांच्या निवासस्थानीच असून त्यांनी कॉंग्रेसबरोबरच राहण्याचे ठरवले आहे. या सहाही आमदारांना विधीमंडळ अधिवेशनात एकत्रपणे सादर केले जाईल, अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली. सध्या मायकेल लोबो, दिगंबर कामत, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि डेलियालाह लोबो हे पाच आमदार कॉंग्रेसच्या संपर्काच्या बाहेर गेले आहेत.
सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी लोबो आणि कामत यांनी भाजपशी हातमिळवणी करून षड्यंत्र रचले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी म्हटले आहे की, पाच आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला असला तरी पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द होणार आहे, ही बाब त्यांनी ध्यानात घेतली पाहिजे. लोबो आणि दिगंबर कामत यांच्यावर कारवाई करणार आहोत, असेही राव यांनी सांगितले.
…म्हणून मूळ शिवसेना ही शिंदेंचीच – केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य