खळबळजनक! एकाच कुटुंबातील पाच जण राहत्या घरात आढळले मृतावस्थेत
Updated On:

कोलकाता – पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण मृतवस्थेत आढळले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
अनुप बर्मन (33) त्यांच्या आई उलबाला बर्मन, पत्नी मल्लिका बर्मन आणि ब्युटी आणि स्निंग्धा या दोन कन्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यंनी सांगितले. दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील जमालपूर गावात ही घटना घडली. हा सामूहिक आत्महत्येचा प्रकार आहे की हत्या आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
अनुप यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत होता, असे पोलिसांनी सांगितले. अनुप यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. त्यांच्या जवळ उपचारांसाठी पैसे शिल्लक राहिलेले नव्हते. त्यामुळेच कुटुंबीयांची हत्या करून त्यांनी आत्महत्या केली असावी, अस अंदाज आहे.





