सुंदर पिचाईची भारताला पाच कोटींची मदत
Updated On:
नवी दिल्ली: गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी भारताला करोनाच्या पार्श्वभूमीवर पाच कोटी रुपयांची मदत केली आहे. या आधी त्यांच्या गुगल कंपनीने करोनाचा मुकाबला करण्यासाठी आठशे दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे.
भारतातील उद्योगपतीही मोठ्या प्रमाणात मदतीसाठी पुढे आले असून त्यांनी पीएम केअर्स निधीला अब्जावधी रूपयांची मदत आत्ता पर्यंत जाहीर केली आहे. गुगल प्रमाणेच पेटीएमनेही भारतीय लष्करासाठी 4 लाख मास्क, दहा लाख अन्य वैद्यकीय सामग्री, आणि अन्य वस्तू दिल्या आहेत.
त्या कंपनीने आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही साबण, सॅनिटायझर अशा वस्तू पुरवल्या आहेत. भारताकडे जगाच्या अन्य भागातूनही आता मदत येऊ लागली असून त्याची सध्या मोठी गरज आहे.





