Pune : थर्टी फस्टमुळे मासळीला सर्वाधिक पसंती

पुणे : मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या उपवासांमुळे कमी झालेली मासळीची मागणी आता वाढली असून, थर्टी फर्स्टमुळे व्यापारी मासळी मागवित आहेत. सध्या गणेश पेठेतील मासळी बाजारात देशाची पूर्व व पश्चिम किनारपट्टीहून मासळीची चांगली आवक होत आहे. मागणीही वाढल्याने मासळीचे गत आठवड्यातील तेजीतील भाव टिकून होते, तर चिकन, मटण, अंड्यांचे दरही टिकून आहेत.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. २९) खोल समुद्रातील मासळी १८ ते २० टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० ते ८०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे २० ते २५ टन आवक झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्याचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १५००, मध्यम : १२००-१४००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ६००-७००, सुरमई : ६००-७००, रावस : लहान ७००-७५०, मोठा ७५०-८००, घोळ : ६००-७००, करली : ३६०-४००, करंदी (सोललेली) : ४००-४४०, भिंग : ३६०-४००, पाला : ४००-१५००. वाम : पिवळी १०००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : २००. कोळंबी : लहान : १६०-३२०, मोठी : ४८०-७००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंगप्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : ३००-३२०, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ४००, चिंबोऱ्या : ६००. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : ३००-७००, तांबोशी : ४८०, पालू : ३००, लेपा : २००, बांगडा : लहान १६०-१८०, मोठा २४०, शेवटे : ३००, पेडवी : १२०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : ३००, खुबे : १५०, तारली : १६०-१८०. नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १६०-१८०, मरळ : ४००-५००, शिवडा : २५०-३००, खवली : २५०-३००, आम्ळी : १४०-१६०, खेकडे : ३००-३५०, चिलापी : ८०-१६०, वाम : ६००. मटण : बोकडाचे ७८०, बोलाईचे ७८०, खिमा ७८०, कलेजी ८००. चिकन २२०, लेगपीस २७०, जिवंत कोंबडी १५०, बोनलेस ३२०. अंडी : गावरान (शेकडा) ११४०, डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ६२५, डझन ९०, प्रतिनग ७.५०.





