Sanya Malhotra : आधी आईने सांभाळावे, मग बायकोने; मुलं ही दोघांची जबाबदारीः अभिनेत्री सान्या मल्होत्राचे परखड मत

अभिनेत्री सान्या मल्होत्रा हि तिच्या मिसेस या सिनेमाने घेऊन प्रचंड उत्सुक आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. नुकत्याच या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री सान्याने महिलांबाबत होत असलेल्या भेदभावावर भाष्य केले आहे. सान्या तिच्या आगामी मिसेस या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने अनेक फिल्म फेस्टीव्हल्समध्ये कौतुकाची थाप मिळवली आहे. आता मिसेस हा सिनेमा झी फायव्ह या ओटीटी माध्यमावर ७ फ्रेब्रुवारीला रिलीज होत आहे.
या सिनेमात सान्याने एका प्रतिभावन डान्सरची भूमिका साकारलेली आहे. जिच्या आयुष्यात लग्नानंतर नाट्यमय वळण येते. ती या सिनेमात एका गृहिणीच्या भूमिकेत आहे. लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होतात. मिसेस सिनेमात पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला कशी वागणूक दिली जाते. याचे चित्रण या सिनेमात पाहिला मिळणार आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन आरती कडव हिने केले आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री सान्याने महिलांकडून ठेवण्यात आलेल्या अनावश्यक अपेक्षांवर भाष्य केले आहे. महिलांचे लग्न आणि बाळंतपणानंतर नोकरी सोडण्यास सांगितले जाते. समाजात महिलांकडून खूप अपेक्षा असतात. आजकाल स्त्रीने मुलाला जन्म दिल्यानंतर नोकरी सोडून जाणे अपेक्षित आहे. पण मूल त्या दोघांचे आहे ना? ही जबाबदारी पती-पत्नी दोघांची आहे. अशा परिस्थितीत कुटुंबात चांगला समन्वय हवा. असे प्ररखड मत तिने मांडले आहे.
लग्नामुळे स्त्रियांची आवड आणि महत्त्वाकांक्षा झटपट का मारली जाते? स्त्रियांना घरात राहून जुळवून घेणं आणि हे सगळं का करावं लागतं? असे अनेक सवाल सान्याने मुलाखती दरम्यान उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर लग्नानंतर पुरुषांना महिलांकडून पूर्ण पाठिंबा मिळतो, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची गरज आहे. एखद्या व्यक्तीला चांगली मुलगी बायको मिळाल्यानंतर त्याचे आयुष्य फुलते. आधी आईने सांभाळावे, मग बायकोने… असा विचार का? असा प्रश्न देखील तिने उपस्थित केला आहे.





