‘ ग्राउंड झिरो’चे पहिले पोस्टर रिलीज; इम्रान हाशमी बीएसएफ कमांडरच्या भूमिकेत

Imran Hashmi |बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेला प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी त्याच्या आगामी चित्रपटात बीएसएफ कमांडरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ग्राउंड झिरो’ असे या चित्रपटाचे नाव आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाची घोषणा केल्यापासून या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाची कथा देशासाठी बलिदान आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांवर आधारित असेल. एक्सेल एंटरटेनमेंटने आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.
पोस्टरमध्ये इमरान हाश्मी दिसत आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हे पोस्टर ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाची आहे. यामध्ये इमरान हाश्मी पाठ आपल्याला दिसत आहे. इमरान हाश्मीने टी-शर्ट घातला आहे आणि त्याच्या हातात बंदूक आहे. पोस्टरमध्ये इमरान हाश्मी खूपच उत्साही दिसत आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ ए मिशन ज्याने काश्मीरला कायमचे बदलले, असे लिहिले आहे. तर पुढे हा चित्रपट 25 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
‘ग्राउंड झिरो’च्या नवीन पोस्टरमध्ये लिहिले आहे, ‘सेनेने तुमचा मृत्यू इथे आणला, गाझी काश्मीरचा बदला घेईल.’ ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात इमरान हाश्मी बीएसएफचे डेप्युटी कमांडंट नरेंद्र नाथ दुबे यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या कथेनुसार तो राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याची दोन वर्षे चौकशी करणार आहे. तसेच या सिनेमात ॲक्शन पाहायला मिळणार आहे. इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात सई ताम्हणकर आणि मुकेश तिवारी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.





