पुण्यात आढळला डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण ?

महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दुजोरा

पुणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेतून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच; आता शहरावर करोनाच्या डेल्टा प्लसचे (Pune Delta plus) संकट ओढावले आहे. शहरात डेल्टा प्लसचा पहिला बाधित आढळून आला आहे.  महापालिकेसह, राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या माहीतीस दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, या रूग्णांची माहिती देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील डेल्टा प्लसच्या रूग्णांचा आकडा 6 वर गेला असून 5 रूग्ण जिल्ह्यातील तर 1 रूग्ण शहरातील असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट्‌ करण्यात आले. त्यामुळे शहरासह जिल्हयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून एका बाजूला उद्या ( रविवार) पासून शहरातील निर्बंध मोठया प्रमाणात शिथील होत असतानाच डेल्टा प्लसचा रूग्ण आढळल्याने शहरासाठीची चिंता वाढाली आहे.
दरम्यान, राज्यात करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराचे आजवर एकूण 66 रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील वेगवेगळ्या भागात डेल्टा प्लसचे रुग्ण पहायला मिळाले आहेत. यामध्ये जळगावला 13, रत्नागिरी 12, मुंबई 11, ठाणे 6, पुणे 6, पालघर 3. रायगड 3, नांदेड 2, गोदिंया 2, आणि चंद्रपूर, अकोला, सिंधूदूर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबात, कोल्हापूर व बीड याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आहे. असे एकूण डेल्टा प्लसचे 66 रुग्ण राज्यात आहेत. यामध्ये दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 10 जणांना पुन्हा करोनाच्या डेल्टा प्लसची लागण झाली आहे. 66 पैकी 8 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशा एकूण 18 लोकांनी लस घेतल्यानंतरी लागण झाली आहे. यामध्ये दोन जणांनी कोव्हाक्‍सिन घेतली आहे तर 16 जणांनी कोव्हिशिल्ड घेतली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.