Satara | पहिल्या महिला बँकेची डिजिटल उगातही दमदार वाटचाल

म्हसवड, (प्रतिनिधी) – २७ वर्षापूर्वी ग्रामीण महिलांनी एकत्र येऊन,, माण देशी महिला सहकारी बँकेची स्थापना केली. ही ग्रामीण भागातील अशी पहिली महिला सह. बँक आहे जिथे आपल्या खातेदार महिलांकरिता दैनदिन बँकिंग बरोबरच, मोबाईल बँकिंग तसेच गुगल पे, फोन पे , भीम , यु.पी.आय. अशा विविध डिजिटल सेवा सुरु केल्या आहेत.
अशा प्रकारच्या डिजिटल सेवा पुरविणारी माणदेशी महिला सहकारी बँक ही देशातील एकमेव महिला ग्रामीण बँक आहे, असे प्रतिपादन बँकेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांनी केले.
म्हसवड येथे बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सारजाई मंगल कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. यावेळी श्रीमती चेतना सिन्हा बोलत होत्या.
सभेची सुरवात बँकेच्या तीन पिढ्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या जेष्ठ सभासद , तरुण सभासद व युवती सभासद यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.
नोटीस वाचन बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा कुलकर्णी यांनी केले. सविस्तर आढावा वाचन सौ. वैशाली जगताप, स्मिता टकले, सौ. मृणालिनी फडतरे, व सौ. हेमलता कोरे यांनी केले. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये बँकेस “अ” वर्ग मिळाला. सभेमध्ये मागील वर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या, डिजिटल सेवांमुळे ग्रामीण भागातील महिला देखील कुठेही मागे राहणार नाही त्या, डिजिटल व आर्थिकदृष्ट्या अधिकच सक्षम होत आहेत,
तेव्हा या सुविधेचा जास्तीस जास्त सभासदांनी लाभ घ्यावा. यावेळी बँकेचे सर्व कर्मचारी, सभासद आणि संचालक यांच्या सेवेबद्दल श्रीमती चेतना सिन्हा यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
“द हिंदू बिझिनेस लाईन” यांच्यावतीने दिला जाणारा “चेंज मेकर” हा पुरस्कार माणदेशी महिला बँकेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी नियमित कर्जफेड करतात अशा कर्जदार महिलांचा सन्मानही करण्यात आला.
माणदेशी फौंडेशनच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती अनघा कामत यांनी दिली. सभेच्या वेळी माणदेशी फौंडेशन आणि माणदेशी हेल्थ सेंटरच्या वतीने संचालक व सभासद यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
सौ. वैशाली शेडगे यांनी सुत्रसंचालन केले. बँकेच्या संचालक दिव्या शिंदे यांनी आभार मानले.२०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बँकेच्या शाखा तसेच वैयक्तिक कर्मचारी यांना मानांकन देऊन पुरस्कृत करण्यात आले.
सर्वोत्कृष्ठ शाखा
सर्वोत्कृष्ठ शाखा प्रथम श्रेणी – शाखा गोंदवले
सर्वोत्कृष्ठ शाखा द्वितीय श्रेणी- शाखा म्हसवड
सर्वोत्कृष्ठ शाखा तृतीय श्रेणी- शाखा वडूज
वैयक्तिक कर्मचारी पुरस्कार
सर्वोत्कृष्ठ वसुली अधिकारी – अश्पाक मुल्ला
सर्वोत्कृष्ठ जे.एल.जी. फिल्ड अधिकारी – सौ. सुरज कट्टे
सर्वोत्कृष्ठ बँक मार्केटिंग अधिकारी – सौ.माधुरी बनसोडे
सर्वोत्कृष्ठ आर डी एजंट- सौ. विमल महामुनी
सर्वोत्कृष्ठ बँक सखी- सौ. मंगला माने





