रॅाबीनहूड चित्रपटातील क्रिकेटर डेव्हिट वार्नरचा फर्स्ट लूक समोर; एकदा बघाच..! मेकर्सनी रिलीज डेटचीही केली घोषणा

दाक्षिणात्य अभिनेता नितीन आणि अभिनेत्री श्रीलीला यांचा आगामी चित्रपट ‘रॉबिनहूड’ चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाचे निर्मातेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडत नाही आहेत. जसजशी या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत आहे, तसतसे चित्रपटाशी संबंधित नवेनवे अपडेट्स समोर येत आहेत. नुकताच ‘रॉबिन हूड’च्या निर्मात्यांनी चित्रपटातचे एक खास फर्स्ट-लूक पोस्टर शेअर केले होते. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर दिसत होता. यानंतर या चित्रपट वार्नर झळकणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद गगणात मावेना असाच झाला होता.
After shining and leaving a mark on the ground, it is time for him to shine on the silver screen 💥💥
Introducing the widely loved @davidwarner31 to Indian Cinema with #Robinhood in an exciting cameo ❤🔥
GRAND RELEASE WORLDWIDE ON MARCH 28th.@actor_nithiin @sreeleela14… pic.twitter.com/mVbvNMvouP
— Mythri Movie Makers (@MythriOfficial) March 15, 2025
या पोस्टरसोबत लिहिले होते, “मैदानावर चमकून आपली छाप सोडल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर चमक दाखवण्याची त्याची पाळी आहे. “Robinhood’ मधील रोमांचक कॅमिओसह डेव्हिड वॉर्नरचे भारतीय सिनेमात स्वागत आहे.” असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले होते. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स करणार आहेत. या निर्मिती संस्थेने पुष्पा २ ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक वेंकी कुदुमुला आहेत. चित्रपटाचे संगीत जी. व्ही. प्रकाश कुमार यांच्या आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 28 मार्चला थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.




