संतोष देशमुख प्रकरणातील पहिला जामीन मंजूर; कोणताही पुरावा न मिळाल्याने न्यायालयाने दिले आदेश

Santosh Deshmukh Case | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मागील दोन महिन्यांपासून चर्चेत आहे. देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. याप्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. तसेच या घटनेला दोन महिने उलटून गेले तरी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. असे असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने 25 हजारांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर केला आहे.
सीआयडीने संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करत 1400 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले असून वाल्मिक कराड हाच मुख्य मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या आरोपपत्रामधून सिद्धार्थ सोनवणे या आरोपीचे नाव कमी करण्यात आले आहे. सीआयडीने आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनवणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मकोका गुन्ह्यातला हा पहिलाच जामीन मंजूर झाला आहे. Santosh Deshmukh Case |
देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा सिद्धार्थ सोनवणेवर आरोप
९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्या दिवशी संतोष देशमुख हे केजहून मस्साजोगच्या दिशेने निघाल्याचे सिद्धार्थ सोनवणेने सुदर्शन घुलेला सांगितले होते. संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याच्या आरोपाखाली सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेण्यात आले होते. अन्य आरोपींसह त्याच्यावरही कारवाई होणार असं म्हटलं जात होतं.
दरम्यान, सिद्धार्थ सोनवणे याच्या विरोधामध्ये सबळ पुरावे न मिळाल्याने त्याचे नाव आरोपी दोषपत्रातून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांच्याच मस्साजोग गावचा आहे. त्यानेच सुदर्शन घुलेला संतोष देशमुख यांच्या लोकेशनबद्दल कळवले होते. Santosh Deshmukh Case |
आरोपपत्रात नेमकं काय?
राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती. मागच्या आठवड्यात सीआयडीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. आरोपपत्रानुसार वाल्मीक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे, असं म्हंटल आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख केला आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती, आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असे या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तर वाल्मिक कराडच्या विरोधातील सर्व पुरावे पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार त्याच्या विरोधामध्ये पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केलेले आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. Santosh Deshmukh Case |
हेही वाचा:





