Beed: मस्साजोग सरपंच निवडणूकीत ट्विस्ट; संतोष देशमुख यांच्या पत्नीविरोधात ‘हा’ व्यक्ती मैदानात
Beed: मस्साजोग ग्रामपंचायतीतील ही निवडणूक भावनिक तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.

Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Beed
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना अश्विनी देशमुख म्हणाल्या, “अण्णा जिवंत असताना त्यांनी गावकऱ्यांसाठी आयुष्य अर्पण केले. गावकऱ्यांच्या आग्रहामुळेच मी निवडणूक लढवत आहे. अण्णांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि गावाची सेवा करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन.” त्यांनी पुढे सांगितले की, “आमची स्वतःची इच्छा नव्हती; मात्र गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत.”
दरम्यान, या पोटनिवडणुकीत बिनविरोध होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी सर्वसाधारण गटातून सरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले की, “संतोष देशमुख यांची हत्या सरपंच पदामुळेच झाली आहे. त्यामुळे, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अश्विनी देशमुख यांनी निवडणुकीपासून दूर राहून पतीला न्याय मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावे.” त्यांनी पुढे सांगितले की, “देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत गाव एकसंघ राहील. आरोपींना शिक्षा होईपर्यंत ग्रामस्थांचा लढा सुरू राहील.”

Beed: मस्साजोग सरपंच निवडणूकीत ट्विस्ट; संतोष देशमुख यांच्या पत्नीविरोधात ‘ हा’ व्यक्ती मैदानात – Dainik Prabhat
तथापि, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे मान्य करत स्वरूपानंद देशमुख यांनी आपणही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. Beed
निवडणूक कार्यक्रम –
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : ७ ते १३ एप्रिल
अर्जांची छाननी : १५ एप्रिल
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : १७ एप्रिल
मतदान : २८ एप्रिल
मतमोजणी व निकाल : २९ एप्रिल
मस्साजोग ग्रामपंचायतीतील ही निवडणूक भावनिक तसेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.





